html

या ब्लॉगवर आपले स्वागत आहे......
कृपया संस्थेचे सदस्य होण्यासाठी Regestration Form भरावा.

Sunday, October 22, 2017

"गेट टू गेदर चा मेळा..."


       अशोक दा ने वेळोवेळी 'गौरवलेल्या' कुर्डुवाडी बार्शी रोडनं प्रवास करावा लागेल असे कधी स्वप्नातही  वाटलं नव्हतं,पण गेट टु गेदर मुळं तो योग आला. किरण दा व जेजे नं सकाळी रिसिव्ह करून केलेल्या पाहूनचारांपुढे रस्त्ये व एस टि महामंडळाची अवकृपा यांचा प्रभाव गौण ठरला.

        नाशकात 12 वर्षांनंतर कुंभमेळा भरतो...दूर दुरून साधू, संन्याशी गंगेत आंघोळ करून पुण्य संचय करतात, तसा हा हि जवळपास दोन तपानंतर भेटी गाठीचा भरलेला मेळाच होता कि. इथं दुर दुरून आलेली मित्रमंडळी जमली होती, ती आठवणींच्या डोहात डुबकी मारून आनंद संचय करण्यासाठी.

       गाठींभेटीं सोबत हास्याचे ठहाके, पिन्याबरोबर जुन्या आंबट गोड आठवणींचा चकना, जेवणासोबत गप्पाष्टकांचा तडका आणि बेधुंद नाच गाणं हे सारं म्हणजे कुंभमेळ्यात संन्याशांनी नदीत डुबकी मारून मिळालेल्या आनंदा पेक्षा नक्कीच जास्त आनंददायी असावं.



     पहिल्या ब्याचची उपस्थिती व उत्साह वाखाणण्याजोगा होता. रामकृष्ण दा, विवेक दा, तात्या दा, जॅकी दा, अशोक दा, गेमराज दा आदी पुष्कळ दादा लोकांची प्रथमच प्रत्यक्ष गाठ भेट झाली, तर भोसले, जमाले, डॉ दीपक आदी 90  वाल्यांची 95 नंतर थेट आत्ताच भेट झाली, जुन्या आठवणींत डोकावन झालं... डॉ मॅक, (जे त्यांच्या सेल्फीपेक्षा हि प्रत्यक्षात जास्त हँडसम आहेत!)  प्रकाश सूर्यवंशी, सुरेश शिंदे आदींचीही नव्याने ओळख झाली.आमच्या ब्याचचा अमर थेट लातूरहून आला होता (तेहि त्याच्या तिठल्या ब्याचंच gt सोडून!) तसे नावांनी सगळेच एकमेकांना ओळखत होते, पण प्रत्यक्षात बघितल्यावर, ओह, तो तू आहेस तर, म्हणत गळा भेटी झाल्या.
     सरतेशेवटी, आपल्या नवीन संस्थेविषयी व तिच्या स्वरूपाविषयी प्राथमिक चर्चा होऊन या सोहळ्याची सांगता झाली.

     किरण दा, जेजे व सीताराम  यांच्या परिश्रमाने व पुढाकाराने हे सारं शक्य झालं म्हणून सर्वांतर्फे या त्रिदेवांचे आभार!  दीपक सरांनी वेळ काढुन, मला वेळेत सोलापूरला सोडल्याबद्दल सरांचे आभार.

     खरं तर हया गाठी भेटी, जुन्या आठवणींत रमनं हे सारं म्हणजे नवोदयचे तेंव्हाचे ते क्षण पुनर्जीवित करण्याचा एक प्रयत्नच असतो की, कारण तेव्हा आपल्याला कुठं ओळखता आलं होत त्या क्षणांच महत्व? तेव्हा तर आपल्याला घरची ओढ! दैवानं दिलेला ते देनं आपल्याला घेता कुठं आलं?...हि खंत, दैवाकडे,  नवोदयनन्सची कायम राहील... म्हणूनच हा शेर, काहीश्या प्रातिनिधिक भावना मांडणारा...

नवोदयचे दिवस म्हणजे, पेग होता तू भरून उंचावलेला,
पण आम्ही साले कर्मदारिद्री, कडवट म्हणत कण्हत रिचवला.
आता कळतंय त्या पेगनं अख्ख आयुष्य नशिल केलं,
पण खंत आमच्या सलते उरी
तेंव्हा चिअर्स म्हणता नाहि आलं...
तेंव्हा चिअर्स म्हणता नाही आलं...

                                                   -Mahendra Pangarkar (Nashik)

1 comment:

  1. महेंद्र दादा खूपच छान, होऊन जाऊ द्या अजून एक दोन लेख..

    ReplyDelete