html

या ब्लॉगवर आपले स्वागत आहे......
कृपया संस्थेचे सदस्य होण्यासाठी Regestration Form भरावा.

Friday, February 16, 2018

नवोदय मधला माझा पहिला दिवस

नवोदय मधला माझा पहिला दिवस

               जुलै महिना 1994, मी माझे वडील आणि काका सोबत तुळजापूरला आलेलो.  एक पेटी, 1 बादली आणि एक मग घेऊन मंदिराच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये एडमिशन ची प्रकिया पूर्ण केली. ते झाल्यावर कळलं अजंता हाऊस मिळालं म्हणून.

              कन्सल सर त्यावेळी प्रिन्सिपल होते. त्यांनी हिंदी मध्ये नाव गाव विचारलं, एवढी शुद्ध हिंदी पहिल्यांदाच ऐकायला मिळालेली.  नंतर अजंता हाऊस मध्ये गेलो रूम नंबर 3 मध्ये डबल कॉट ची सोय, त्यातला एक कॉट खिडकीच्या बाजूचा मिळाला. Prasad Pawar आणि मी सोबतच लहानपणापासून  ही एकत्रच आणि विशेष म्हणजे तो आमच्या बॅच ला नवोदय च्या परीक्षेत जिल्ह्यातून पहिला आलेला. पतंगे सर ( देशमुख सर) आमचे हाऊस मास्टर त्यांना विनंती करून प्रसाद आणि मी एकाच रूम मध्ये जागा मिळवली.

              गादी वगैरे सगळं लावून झाल्यावर अजून एक आमचा रुममेट Rajesaheb Patil यांचं पण आगमन झालं. पालकांनी  वापस जायची वेळ झाली तेव्हा प्रसाद च्या पप्पांनी एक puzzle विचारला आम्हा तिघांना. मी आणि प्रसाद आपल विचार करतोय तोवर राजेसाहेब नी जराही विलंब ना लावता उत्तर देऊन टाकलं. मग काय तिघांच्या घराच्यासमोर राजेसाहेब चं जे इम्प्रेशन पडलं ते आजतागायत कायम आहे. नंतर आम्ही विचारलं कसं येतंय कसं येतंय हे उत्तर तेव्हा राजांनी आम्हाला त्यांच्या खास नागुर च्या / लोहाऱ्याच्या भाषाशैलीत समजावून सांगितलं. 

             संध्याकाळी मेस मध्ये लाईनीत जेवायला गेलो तिथे 7 वीच्या भैया लोकांची ओळख झाली. मेस मध्ये भरलेली ताट बघून लईच आनंद झाला, लिंबू पण मिळालेला त्या दिवशी. जेवताना अजिबात बोलायचं नाही जे पाहिजे ते हात वर करून योग्य ते बोट दाखवायचं. नियम ठरले होते वरणासाठी 2 बोटे, भातासाठी 5 ही बोटं, चपातीला 1 बोट वगैरे वगैरे. 

                Hanumant Jadhavar  त्यावेळी अजंता हाऊस  चा कॅप्टन, Amol Gund व्हाइस कॅप्टन. Sunetra Alset मॅडम नी जेवण झाल्यावर आमच्या आमच्या हाऊस मध्ये आम्हाला उंचीनुसार followin मध्ये जागा नेमून दिली.

                 पहिलाच दिवशी बरेच इंग्लिश शब्द कानावर पडत होते  चांगलं वाटत होत पण भीती ही वाटतं होती की आपल्याला पाठ करायला किती दिवस लागतील ह्याची.  इंग्लिश शब्द जसे की principal,  house master, vice captain, prefect, school captain, attendance, height, weight, table chair, followin..books, bag, etc..

                     मग प्राचार्य  Kansal sir यांनी  त्यांची  ओळख करून दिली आणि आमचं स्वागत केलं.  पतंगे सर ने सगळ्यांचं जेवण झालं का? जेवण आवडलं का ह्याची खात्री केली.  KR Kamble  sir नीही आमची जेवण झाल्याची खात्री करून घेतली. Dadasaheb Wadikar  त्यावेळी 12 वीला गेले होते, अजूनही तेच स्कूल कॅप्टन होते कारण 11 वी ची बॅच चालू झाली नव्हती. त्यांनी सावधान विश्राम ची ऑर्डर देऊन सगळ्या house captain कडून attendance घेतला आणि JP sir na दिला.

                   जेवणानंतर हॉस्टेल वर आलो, येताना कॅप्टन आणि व्हाइस कॅप्टन ने स्वतःची जबाबदारी पार पाडत आम्हाला लाईन मध्ये चालणं शिकवलं, (followin 3). थोड्या वेळाने पतंगे सर नी आम्हाला बाहेर बोलावून सगळ्यांचे नाव गाव विचारून आई वडिलांच्या बाबतीत माहिती घेतली. 7 वीच्या मुलांनीही त्यांची माहितीं सांगितली. मग पतंगे sir आम्हाला good night म्हणून निघून गेले. 

               पण पहिला दिवस आम्हाला कुठं झोप येते, त्यातच 7 वी तले  आमचे भैया Dayanand Dhekane, Pankaj Patil,   आणि सुधीर आठवले हे तिघे आमच्या रूम मध्ये. नव्या पेट्यामध्ये काय काय नवा खाऊ आहे ह्याकडेच जास्त लक्ष, त्यात Nagnath Patil यांनी रूम मध्ये हजरी लावली आणि फार आपुलकीने आणि जवळीक तेने आमच्याशी गप्पा गोष्टी चालू केल्या. मग आपल थोडा थोडा खाऊ उघडला आणि ह्यांनी आम्हाला मोलाच्या गोष्टी सांगत त्यावर ताव मारला. आणि त्यानंतर रात्री रूम कॅप्टन ने आम्हाला झोपण्याचा आदेश दिला. सकाळी लवकर उठायचं आहे morning PT la अजिबात उशीर चालणार नाही ही सक्त warning. 
                  सकाळी लवकर उठायची भीती मनात ठेऊन फटाफट झोपी गेलो. 
                असा होता आमचा पहिला दिवस.
                अर्धवट आठवून लिखित स्वरूपात मांडायचा प्रयत्न केलाय बाकी तुमच्या कॉमेंट्स ने ते पूर्ण होईल ह्याची खात्री आहेच.
सीताराम गायकवाड
जवाहर नवोदय विद्यालय, तुळजापूर
बॅच: १९९४

No comments:

Post a Comment